Department of Economics

Department Information

Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya was established in 1971 and Department of Economics was started in 1974. In the Department of Economics, Prof. Mr. K. H. Thakkar, Prof. Mrs. M. B. Kulkarni, Prof. Mr. P. S. Redekar and Prof. Mr. S. T. Mule and Mrs. N. B. Vibhute was working as a professor.

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची स्थापना 1971 साली झाली व अर्थशास्त्र विभाग 1974 ला सुरू करण्यात आला. अर्थशास्त्र विभागात प्रा. श्री. के. एच. ठक्कर, प्रा. सौ. एम. बी. कुलकर्णी, प्रा. श्री. पी. एस. रेडेकर व प्रा. श्री एस. टी. मुळे प्राध्यापक व सौ. एन. बी. विभुते प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

Facilities

Study Tour (शैक्षणिक अभ्यास सहल ) :

Study tours are organized every year for the students to get acquainted with the business economics and to get acquainted with the subject. This activity includes visits to Warna Sahakari Karkhana, Varna Sahakari Dudh Sangh, Kolhapur District Sahakari. Milk Producers Association Ltd. (Gokul) and Mahabaleshwar, Ganpatpule, Sindhudurg, Devbagh.

विद्यार्थीना व्यावसायिक अर्थशास्त्र लक्षात येण्यासाठी व विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी अभ्यास सहलीचे आयोजन केले जाते. यामध्ये वारणा सहकारी कारखाना, वारणा सहकारी दूध संघ, कोल्हापूर जिल्हा सहकारी सह. दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) तसेच महाबळेश्वर, गणपतपुळे, सिंधुदुर्ग, देवबाग अशा ठिकाणी एकदिवशीय अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे.

Poster Presentation (भित्तिपत्रके ):

Each year the students of the department prepare and display posters related to economics and based on current events. These include the impact of demonetization on the Indian economy, India's GST. Systems, budgets, new economic policy, globalization, etc. were included in the poster.

विभागातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी अर्थशास्त्राशी संबंधीत व चालू घडामोडीवर आधारीत भित्तीपत्रके तयार केली जातात व ती प्रदर्शित केली जातात. यामध्ये नोटबंदीवरील भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, भारतातील जी.एस.टी. प्रणाली, अंदाजपत्रक, नवीन आर्थिक धोरण, जागतिकीकरण इत्यादी भित्तीपत्रकाचा समावेश केला होता.

Departmental Libraries (विभागीय ग्रंथालय ):

The Department has the Library. The library has more than 50 reference books, RBI Annual Reports. Professors also provide their own reference books.

अर्थशास्त्र विभागाचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये 50 पेक्षा जास्त संदर्भग्रंथव आर. बी. आय. चे वार्षिक अहवाल आहेत. त्याचबरोबर प्राध्यापकांकडून स्वत:ची संदर्भ पुस्तके देखील पुरविली जातात.

Innovative Programmes (नाविण्यपूर्ण उपक्रम ):

The Department of Economics has started this course from the year 2020-21 under the continuing education curriculum to impart knowledge of bond market transactions to the students.

विध्यार्थ्यांना रोखे बाजार व्यवहाराचे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी निरंतर शिक्षण अभ्यासक्रमातंर्गत अर्थशास्त्र विभाग सन 2020-21 पासून रोखे बाजार व्यवहार हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

WhatsApp Group:

WhatsApp group has been created to continue the educational process during the period of Covid-19 and the necessary instructions are given through the group as well as a link to take a lecture through Zoom Application. Students are given written notes as well as videos on the subject taught.

कोव्हिड-19 च्या कालावधीत शैक्षणिक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी WhatsApp ग्रुप तयार केला असून ग्रुपच्या माध्यमातून आवश्यक सूचना दिल्या जातात तसेच Zoom Application च्या माध्यमातून लेक्चर घेण्यासाठी लिंक दिली जाते. विद्यार्थ्यांना शिकवलेल्या प्रकरणासंदर्भात लिखित नोट्स तसेच व्हिडीओ पाटवले जातात.

Internal Evaluation Methods (अंतर्गत मूल्यमापन पध्दती ) :

Evaluation methods like Open Book Exam, Preliminary Exam, Objective Examination etc. are being used for academic evaluation of students and seminars and projects are prepared by the students.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी ओपन बुक एक्झाम, प्रिलिमिनिरी एक्झाम, वस्तूनिष्ठ परिक्षा इत्यादी मूल्यमापन पध्दतीचा अवलंब केला जात असून विद्यार्थ्याकडून सेमिनार व प्रोजेक्ट तयार करून घेतले जातात .

Social Commitment (सामाजिक बांधिलकी ):

The Department of Economics has also taken care of social commitment along with academic work. As part of this, in view of the nature of the natural calamity that occurred in August 2019, rice was provided to support the victims. Also, in view of the spirit of philanthropy towards the community, the cane workers and their children in the Asurle Porle factory area were given old but suitable clothes and other useful materials. During the period of Covid-19, one day's salary for the months of March and May 2020 is paid to the government as assistance. Dr. Mrs. S. S. Rathod has been giving Rs. 1000/- to the 1st Rank students in 10th at Karmaveer Bhaurao Patil High School, Mahisal. A prize of Rs. Rathore has donated Rs 10,000.

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकीची जपणूकही केली आहे. याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट 2019 ला उद्भवलेल्या महापूर या नैसगिक संकटाचे स्वरूप लक्षात घेता संकटग्रस्तांना आधार देण्याच्या दृष्टीने तांदुळ देण्यात आले. तसेच समाजप्रती असणारी दातृत्वाची भावना लक्षात घेऊन आसूर्ले पोर्ले कारखाना परिसरातील ऊसतोड कामगारांना व त्यांच्या मुलांना जुने परंतू वापरणे योग्य असणारे कपडे व इतर उपयुक्त साहित्य देण्यात आले. कोव्हिड-19 च्या कालावधीत मार्च व मे 2020 या महिन्यातील एक दिवसाचे वेतन शासनाला मदत म्हणून दिले जाते. डॉ. एस.एस.राठोड यांनी कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, म्हैसाळ येथे इ. 10 वी मध्ये प्रथम येणार्या मुलीसाठी 1000 रुपये रक्कम पारितोषिक म्हणून देतात व त्याच हायस्कूलसाठी सौ. राठोड यांनी 10,000 रुपयांची मदत दिली आहे.