Events Details

Event Heading "क्लब सायंशीया" चे दिमाखदार उदघाटन
Event Date 4/9/2019
Event Detail दि. ४ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या "क्लब सायंशीया" या शिक्षकांच्या समूहाचे उदघाटन मा. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते "सायंशीया" या चित्रफीत रिलीज करून झाले. विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. मकरंद ऐतवडे यांनी हा क्लब स्थापन करण्यामागची भूमिका आणि संकल्पना सांगितली. या कलबच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमातून प्राध्यापकांमध्ये आत्मविश्वास नक्क्कीच वाढेल असा विश्वास प्रा. डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी दर्शिविला. यानिमित्त भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख श्री एस. एल. देशपांडे यांचे "अवकाश क्षेत्रातील संशोधनाच्या संधी" याविषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. आर. जे. भोसले आणि अधीक्षक श्री. एम. व्ही. भोसले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. प्रा. ए. ए. सय्यद मॅडम यांनी श्री. एस. एल. देशपांडे सरांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा. पी. एच. देसाई सर यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्यास विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


Photo Gallery