Department of Psychology

Department Information

Department of Psychology as started in 1971. Since the establishment of the college, the subject of psychology has been only B.A. Parts one and two are taught for this class. Traditional Logic is also an interdisciplinary subject (IDS) with a BA in Psychology. Part two is taught. In the early days, Prof. Kadam and Prof. Gawde was working for some time. After that Prof. R. H. Kulkarni was appointed permanently on July 24, 1977. He taught for 23 years. Nearly 13 years after his term ended on June 30, 2000, on the Tasika principle (CHB). Professors were appointed. In this Prof. Sunita Patil, Prof. Kalpana Patil, Prof. Shilpa Kumbhar, Prof. Jeevan Patil, Prof. Prabhakar Patil and Dr. A. B. Balugade did the teaching work. Since June, 2013, Dr. A. B. Balugade was appointed as a permanent professor.

Prof. R.H. Kulkarni was the first head of the psychology department. In the current situation, Dr. A. B. Balugade is working as the head of this department / subject. He holds educational qualifications like M.A., B.Ed., SET. He has published 14 national and international research articles on various topics. In addition, as the head of the college's counseling room, he has undertaken a number of initiatives aimed at resolving the academic and personal problems of many students and creating awareness among the students about the current Corona disease.

मानसशास्त्र विभाग

मानसशास्त्र विभागाची/विषयाची सुरुवात 1971 साली झाली. अगदी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून मानसशास्त्र विषय हा केवळ बी.ए. भाग एक आणि दोन या वर्गासाठी शिकविला जातो. तसेच पारंपरिक तर्कशास्त्र हा आंतरविद्याशाखीय विषय (IDS) देखील मानसशास्त्र या विषयाच्या जोडीने बी.ए. भाग दोनसाठी शिकविला जातो. सुरुवातीच्या काळात प्रा. कदम आणि प्रा. गावडे हे काही कालावधीसाठी कार्यरत होते. त्यानंतर प्रा. आर. एच. कुलकर्णी यांची 24 जुलै 1977 रोजी कायमस्वरूपी नियुक्ती झाली. त्यांनी 23 वर्षे अध्यापन कार्य केले. त्यांचा कार्यकाल 30 जून 2000 साली संपल्यानंतर जवळपास 13 वर्षे तासिका तत्वावरील (CHB) प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये प्रा. सुनीता पाटील, प्रा. कल्पना पाटील, प्रा. शिल्पा कुंभार, प्रा. जीवन पाटील, प्रा. प्रभाकर पाटील आणि प्रा. ए. बी. बलुगडे यांनी अध्यापन कार्य केले. जून, 2013 पासून प्रा. ए. बी. बलुगडे हे कायमस्वरूपी प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.

प्रा. आर.एच. कुलकर्णी हे मानसशास्त्र विभागाचे/विषयाचे पहिले विभागप्रमुख होते. सद्यपरिस्थितीत प्रा. ए. बी. बलुगडे हे या विभागाचे/विषयाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी एम.ए., बी.एड., सेट अशी शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. त्यांचे विविध विषयांवरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 14 संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. याशिवाय, महाविद्यालयाच्या समुपदेशन कक्ष प्रमुख या नात्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यक्तिगत समस्यांचे निराकरण आणि सध्याच्या कोरोना या आजाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी काही उपक्रमदेखील राबविले आहेत.

Teaching methods:

Apart from lectures, group discussions, quizzes, seminars, homework, book review, book review, use of ICT tools, - current on-line teaching to students through Goggle Meet, prepared notes self logic, YouTube, etc. Efforts have been made through the department to facilitate the teaching-learning process to the students through social media and to increase the knowledge base of the students. Apart from this, there is also an emphasis on demonstration (psychoanalysis) in order to gain a direct knowledge of the subject of psychology.

अध्ययन-अध्यापन पध्दती:

मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांच्या अध्यापनासाठी व्याख्यान पध्दती, गटचर्चा पध्दती, प्रश्नोत्तर पद्धती, सेमिनार, गृहपाठ, बूक रिव्यू (Book review), ICT साधनांचा वापर, सध्यस्थितीत Goggle Meet द्वारे विद्यार्थ्यांना ऑनलार्उन अध्यापन, स्व: रचित नोट्स (self-prepared notes) याशिवाय WhatsApp, YouTube, इ. सामाजिक माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी आणि विद्यार्थ्यांचे ज्ञानभांडार वृध्दिंगत व्हावे यासाठी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले आहेत. याशिवाय मानसशास्त्र विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रात्यक्षिकवर (मनोमापन) देखील भर दिला जातो.

Study Source:

In addition to the above oral teaching-learning methods, various study resources are used to facilitate the teaching and learning process of psychology and logic and to update the knowledge of the students along with the professors. The following table shows the types of study sources used and their number.

अध्ययन स्त्रोत:

मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी वरील मौखिक अध्ययन-अध्यापन पद्धतीबरोबरच विविध अध्ययन स्त्रोतांचा वापर केला जातो. खालील तक्त्यामध्ये वापरले जाणारे अध्ययन स्त्रोत प्रकार आणि त्यांची संख्या दर्शविली आहे.

1. e-cooks :14

2. PPTcank : 32

3. e-journals : 15

4. YouTube videos : 70

Departmental Libraries:
]

A departmental library has been set up through the Department of Psychology. This departmental library has 42 books.

विभागीय ग्रंथालय :

मानसशास्त्र विभागाच्या माध्यमातून विभागीय ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. या विभागीय ग्रंथालयामध्ये 42 पुस्तके आहेत.

Internal Evaluation Methods:

A variety of internal assessment methods have been used by the department to assess psychology and logic. These include Open cook exam, based on each component / case Unit test when needed Surprise are also conducted. Such an internal assessment system has also had a favorable effect on students' performance in the final exams. The students with the objective of enabling them to prepare well for the exams or to study more and more question bank has also been provided to

अंतर्गत मूल्यमापन पध्दती :

विभागाच्यावतीने मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांच्या मूल्यमापनासाठी विविध प्रकारच्या अंतर्गत मूल्यमापन पध्दती वापरल्या गेल्या आहेत. यामध्ये खुली पुस्तक परीक्षा (Open cook exam), प्रत्येक घटकावर/प्रकरणावर आधारित घटक चाचणी (Unit test) काहीवेळा कधी गरज भासेल तेव्हा Surprise test देखील घेण्यात आल्या आहेत. अशा अंतर्गत मूल्यमापन पध्दतीमुळे विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेतील निष्पादनावर अनुकूल परिणाम देखील झाला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी उत्तमप्रकारे करता यावी किंवा अधिकाधिक अभ्यास करता यावा हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांना विषयवार प्रश्नकोश (Question bank) देखील पुरविला गेला आहे.

Comparative Performance of the Department:

of the previous two NAAC assessment processes of the Department of Psychology was not very satisfactory. Pvt. R. H. For almost 13 years after Kulkarni's retirement, the responsibility of this department was entirely with the professors on CHB. However, with the help of this department, Dr. P. R. Shewale was overseeing the work. First NAAC evaluation process, the contribution of the department is not visible in any form. In the second phase, apart from organizing 1 research paper, 1 national seminar and ISBN proceedings of the department, two alumni of the department SET examination. However, in the current third NAAC assessment process, the Department of Psychology has organized a national webinar in addition to the publication of research articles in about 11 national and international proceedings and journals.

विभागाची तुलनात्मक कामगिरी :

मानसशास्त्र विभागाची मागील दोन NAAC मूल्यांकन प्रक्रियेतील चित्र फारसे समाधानकारक नव्हते. प्रा. आर. एच. कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्तीनंतर जवळपास 13 वर्षे ह्या विभागाची जबाबदारी पूर्णपणे तासिका तत्वावरील प्राध्यापकांकडे होती. मात्र या विभागाचे खपलहरीसशी म्हणून डॉ. पी. आर.शेवाळे हे काम पाहत होते. पहिल्या NAAC मूल्यांकन प्रक्रियेचा विचार करता कोणत्याही स्वरुपात विभागाचे योगदान दिसून येत नाही. दुसर्या टप्प्यामध्ये विभागाच्यावतीने 1 संशोधन लेख, 1 राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन आणि ISBN proceeding चे प्रकाशन याशिवाय विभागातील दोन माजी विद्यार्थी SET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र सध्याच्या तिसर्‍या NAAC मूल्यांकन प्रक्रियेमध्ये जवळपास 11 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोसेडिंग्स आणि जर्नल्समध्ये संशोधन लेखांचे प्रकाशन याशिवाय एका राष्ट्रीय वेबिनारचे आयोजनदेखील मानसशास्त्र विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.