Activities

Social Commitment:

The Department of Geography is sensitive to social commitment. Kerala floods, floods in Kolhapur-Sangli district showed readiness to provide food and clothing to the victims. The Chief Minister Kovid-19 Assistance Fund has been financially supported by the faculty. Dhwajanidhi, Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Nidhi has helped for this. The students of the department have raised by visiting the ashram school. Active participation in campus cleaning activities was done by students.

सामाजिक बांधिलकी :

भूगोलशास्त्र विभाग सामाजिक बांधिलकीबाबत संवेदनशील आहे. केरळ महापूर, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापूर अशा आपत्तीत बाधितांना अन्न व वस्त्र स्वरूपात मदत करण्यात तत्परता दाखविली. मुख्यमंत्री कोविड-19 सहाय्यता निधीस प्राध्यापक वर्गाने आर्थिक सहाय्य केले आहे. ध्वजनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निधी यासाठी सहाय्य केले आहे. विभागाच्या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेस भेट देऊन मदत केली आहे. परिसर स्वच्छता उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला जातो.

Seminars:

International Seminars:

On behalf of the Department of Geography. An interdisciplinary international seminar on 'Agriculture and Rural Development' was organized on 15th December 2018. Prof. Dr. Saptarshi, Praveen (USA) was the keynote speaker and Shri. Scott Kaphora (USA), Dr. Prabir Kumar Rath (Goa), Principal Prof. Dr. Ambadas Jadhav (Silvasa) etc. Guiding guests, keynote speakers were present. The seminar was attended by more than 350 researchers and professors.

National Seminar:

On the topic "Regional Inequality in India" the three-day National Seminar was held from 15 to 17 November 2002. Prof. Dr. N. C. Vijayraj, Dharwad University, Karnataka and Dr. Raimane (University of Bangalore) were present as the keynote speaker and chief guest. The seminar was attended by 300 researchers and professors.

Biodiesel Product Seminar:

A seminar for farmers was organized on March 20, 2005. A total of 193 farmers from South Maharashtra and nearby Belgaum (Karnataka) participated.

चर्चासत्रे :

आंतरराष्ट्रीय चर्चासत्र :

भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने दि. 15 डिसेंबर 2018 रोजी ‘शेती आणि ग्रामीण विकास’ या विषयावर आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. प्रोफेसर डॉ. सप्तर्षी, प्रवीण (यु.एस.ए.) हे बीजभाषक व श्री. स्कॉट कफोरा (यु.एस.ए.), डॉ. प्रबीरकुमार रथ (गोवा), प्राचार्य प्रोफेसर डॉ. अंबादास जाधव (सिल्वासा) इ. मार्गदर्शक पाहुणे, प्रमुख वक्ते उपस्थित होते. चर्चासत्रात 350 हून अधिक संशोधक-प्राध्यापक सहभागी झाले होते.

राष्ट्रीय चर्चासत्र

भारतातील प्रादेशिक विषमता’ या विषयावर दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2002 या कालावधीत तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. प्रोफेसर डॉ. एन. सी. विजयराज, धारवाड विद्यापीठ, कर्नाटक व डॉ. रायमाने (बेंगलूर विद्यापीठ) हे बीजभाषक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चर्चासत्रात 300 संशोधक-प्राध्यापक सहभागी झाले होते.

बायोडीझेल उत्पादन चर्चासत्र

दि. 20 मार्च 2005 रोजी शेतकरी बांधवांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र व जवळच्या बेळगाव (कर्नाटक) राज्यातील एकूण 193 शेतकरी सहभागी झाले होते.

Leading Workshop:

Further workshops were organized by the Department of Geography under the leading college initiative.

  • Disaster Management, Date 28-02-2014, Lecturers - Pvt. Sanjay Dhigale, Shri. Ashok Rokade, Pvt. Anil Ghaste.
  • GPS Use of technique in Geography, Date 03-02-2016, Lecturer - Dr. Ratnadeep Jadhav, Dr. R. S. Shikalgar, Pvt. R. B. Bhaskar.
  • Remote Sensing Techniques in Geography and Satellite Image Reading, Date 30-01-2020, Lecturer - Dr. Ratnadeep Jadhav, Dr. R. S. Shikalgar, Shri. Abhijeet Patil
अग्रणी कार्यशाळा :

भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय उपक्रमातंर्गत पुढील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.

  • आपत्ती व्यवस्थापन, दि. 28-02-2014, व्याख्याते - प्रा. संजय ढिगळे, श्री. अशोक रोकडे, प्रा. अनिल घस्ते.
  • भूगोलशास्त्रातील जी.पी.एस. तंत्राचा उपयोग, दि. 03-02-2016, व्याख्याते - डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. आर. एस. शिकलगार, प्रा. आर. बी. भास्कर.
  • Remote Sensing Techniques in Geography and Satellite Image Reading, Date 30-01-2020, Lecturer - Dr. Ratnadeep Jadhav, Dr. R. S. Shikalgar, Shri. Abhijeet Patilभूगोलशास्त्रातील सूदूर संवेदन तंत्र व उपग्रह प्रतिमा वाचन, दि. 30-01-2020, व्याख्याते -डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. आर. एस. शिकलगार, श्री. अभिजीत पाटील
Complementary activities:

Special days like Geography Day, World Population Day, Ozone Day, Traditional Costume Day are celebrated by organizing events. Lectures are conducted under the guidance of eminent lecturers. These activities are organized by 'Vasundhara Mandal', of student geography study board.

पूरक उपक्रम :

भूगोल दिन, जागतिक लोकसंख्या दिन, ओझोन दिन, पारंपरिक वेशभूषा दिन असे विशेष दिन कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरे होतात. नामवंत व्याख्यात्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. सदरच्या उपक्रमांचे ‘वसुंधरा मंडळ’ या विद्यार्थ्यांच्या भूगोल अभ्यास मंडळामार्फत आयोजन करण्यात येते.

Study Tour:

For the third year, a 'South India Study Tour' is organized every year for Geography students. Students who do not participate in this 8 to 10 day study tour for them a 'one day trip' to the nearest tourist spot is organized. This annual trip is a feature of the Geography Department.

अभ्यास सहली :

तृतीय वर्ष भूगोलशास्त्र विद्यार्थ्यांची ‘दक्षिण भारत अभ्यास सहल’ प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. सदरच्या 8 ते 10 दिवसांच्या अभ्यास सहलीत जे विद्यार्थी सहभागी होत नाहीत त्यांची ‘एक दिवसीय सहल’ जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना आयोजित करण्यात येते. प्रतिवर्षी आयोजित होणारी ही सहल हे भूगोल विभागाचे वैशिष्ट्य आहे.